सानपाडा विभागात विनापरवानगी बांधकामांवर तोडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तुर्भे विभागा अंतर्गत श्रीम. वनिता अशोक पाटील, घर क्र. 119/2, पिंपळपाडा, से.05, सानपाडा, नवी मुंबई, यांनी विनापरवानगी घर क्र. 119/2 पिंपळपाडा, से.05, सानपाडा, येथे सुमारे 9.40 मी.x 6.00 मी. या मोजमापाचे G + 2 चे R.C.C. बांधकाम सुरु आहे.
सदर अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 53 1(अ) अन्वये देण्यात आलेली 24 तास मुदतीची नोटीस (कलम 52 च्या कलम 1 च्या खंड “अ” व “क” अन्वये ठरत असलेल्या अनधिकृत विकासकामाची नोटीस बजावण्यात आलेली होती.
तसेच सदर अनधिकृत बांधकाम यापुर्वी दि.12 जानेवारी 2023 रोजी निष्कासित करण्यात आलेले होते.याशिवास सदर अनधिकृत बांधकामावर गुन्हा क्र. 0172/2023, दि.28/10/2023 अन्वये दाखल करण्यात आलेला आहे.
परंतु, सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरुच असल्याचे पुनश्च: निदर्शनास आले होते. सदर अनधिकृत बांधकामावर सिडको व डी विभाग तुर्भे, नवी मुंबई महानगरपालिका यांचे मार्फत संयुक्त तोडक कारवाईच्या मोहिमेचे आयोजन करुन सदरचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेले आहे.
सदर मोहिम मा. नियंत्रक अनधिकृत बांधकामे, सिडको श्री. वेणु नायर व मा. सहाय्यक आयुक्त, तुर्भे श्री. भरत धांडे, यांचे नियंत्रणाखाली सिडकोचे अधिकारी/कर्मचारी व तुर्भे विभागातील अधिकारी/कर्मचारी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली आहे.
तसेच सदर मोहिमेसाठी सिडको, अतिक्रमण निर्मुलन पथकातील पोलीस अधिकारी/अंमलदार आणि सिडको व मनपा अतिक्रमण विभागातील सुरक्षारक्षक देखील तैनात ठेवण्यात आले होते.
वरील अनधिकृत बांधकाम हटविण्याकरीता सिडकोकडील पोकलेन, जे.सी.बी. यांचा वापर करण्यात आला आहे.
तसेच यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 14-03-2024 12:03:49,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update