घणसोली विभागात विनापरवानगी बांधकामांवर तोडक कारवाई
- श्री.मंगेशमारुती म्हात्रे (घरमालक) श्री.रुपेश सदानंद म्हात्रे (विकासक), मरिआई गोठिवलीजवळ, घणसोली यांचे तळमजला + तिस-या मजल्याचे बांधकाम प्रगतीपथावर होते, नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे काम सुरु होते. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हुन हटविणे आवश्यक होते. पंरतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
- श्री.अनंतमहादेव म्हात्रे (घरमालक व विकासक), शिवाजी तलाव परिसर कापरीबाबाबा नगर, घणसोली यांचे आर.सी.सी., जोत्याचे प्रगतीपथावर होते., नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे काम सुरु होते. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम हटविणे आवश्यक होते. पंरतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
3.श्री.रुपेश हिरा पाटील,शिवाजी तलाव परिसर, कापरीबाबा नगर, घणसोली येथे तळमजला+पहिल्या मजल्याचे बांधकाम प्रगतीपथावर होते, नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे काम सुरु होते. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हुन हटविणे आवश्यक होते. पंरतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
सदरच्या तीन ठिकाणच्या अनधिकृत बांधकामावर नवी मुंबई महानगरपालिका व मे. सिडको यांनी संयुक्त तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार सदरील अनधिकृत बांधकाम 02 पोकलेन मशिन्स व 12 कामगार यांच्या सहाय्याने निष्कासीत करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अधिकारी / कर्मचारी व सिडको अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस पथक तैनात होते.
यापूढे देखील अशा प्रकारे कारवाई तिव्र करण्यात येणार आहे.
Published on : 20-03-2024 13:11:30,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update