पामबीच मार्गाच्या पूर्वेकडील बाजूस सेवारस्त्याच्या दुभाजकांमध्ये गोल्डन बांबू वृक्षरोपांची लागवड
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वृक्षलागवड करताना देशी वृक्षरोपांची लागवड करण्यावर भर दिला जात असून आज पामबीच मार्ग आणि पूर्वेकडील सर्व्हिस रोडच्या मधल्या जागेत गोल्डन बांबूचे वृक्षारोपण करण्यात आले. नमुंमपा उदयान विभागाच्या वतीने स्टार युनियन दाई – ईची लाईफ इन्शुरन्स यांच्या सीएसआर निधी प्रकल्प सहयोगातून 6 हजार गोल्डन बांबू वृक्षारोपांची एनआरआय पोलिस ठाणे समोरील सर्व्हिस रोड पासून वाशीच्या दिशेने पामबीच रस्त्याच्या कडेला वृक्षलागवड करण्यात येत आहे. त्यामधील 500 गोल्डन बांबू वृक्षरोपांचे आज महापालिका मुख्यालयासमोरील एनआरआय पोलिस स्टेशन ते एनआरआय कॉलनी या सर्व्हिस रोडनजिकच्या दुभाजकांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिेंदे यांच्यासमवेत उपस्थितांनी माझी वसुंधरा अभियानाची पर्यावरण संरक्षक शपथ घेतली व वृक्षारोपणाचा शुभारंभ केला. वसुंधरेचे अर्थात पृथ्वीचे संरक्षण करणे ही आपली सामुहिक जबाबदारी असून यासाठी प्रत्येकाने योगदान देणे महत्वाचे असल्याचे सांगत आयुक्तांनी सीएसआर निधीतून वृक्षारोपण करीत असल्याबद्दल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, दाई – ईची लाईफ यांची प्रशंसा केली.
याप्रसंगी आयुक्त डॉ.कैलास शिेंदे यांच्या समवेत अतिरिक्त् आयुक्त् तथा शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, उदयान विभागाचे उपआयुक्त् श्री.दिलीप नेरकर, परिमंडळ 1 चे उपआयुक्त् श्री. सोमनाथ पोटरे, बेलापूर विभाग अधिकारी तथा सहा.आयुक्त् श्री.शशिकांत तांडेल, कार्यकारी अभियंता श्री.राजेश पवार, उदयान अधिक्षक श्री. भालचंद्र गवळी व श्री. प्रकाश गिरी त्याचप्रमाणे स्टार युनियन दाई – ईची लाईफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री.अभय तिवारी, उपव्यवस्थापकीय संचालक श्री.मसॅटो नेगिशी, सर्वश्री मोहित रोछलानी, गणेश मुरुडा, प्रशांत शर्मा, राकेश कुमार, साई कुमार आणि इतर नागरिक व कर्मचाऱ्यांच्या हस्ते गोल्डन बांबूचे वृक्षारोपण करण्यात आले. बेलापूरपासून वाशीपर्यंत पामबीच मार्गाच्या पूर्व बाजूला 6 हजार गोल्डन बांबू वृक्षरोपांची लागवड करण्यात येत असून त्यामधील हरितपट्टयात आंबा, जांभूळ अशा देशी वृक्षरोपांची ठराविक अंतरावर लागवड करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
Published on : 28-06-2024 10:38:45,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update