कोव्हिड - 19 आजचे अपडेट (07/05/2020)
l आज 15 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण निगेटिव्ह होऊन बरे झाले आहेत व आपल्या घरी परतले आहेत.
l विभागनिहाय बरे झालेले नागरिक संख्या : बेलापूर - 6, नेरूळ - 1, वाशी - 3, तुर्भे - 2,
घणसोली - 1, ऐरोली - 1, दिघा - 1.
----------------------------------------------------------------
l आज 271 कोरोना टेस्ट रिपोर्ट प्राप्त झाले. त्यामध्ये 227 रिपोर्ट निगेटिव्ह आणि 44 रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त.
l आज पॉझिटिव्ह नोंदीत रूग्ण संख्या - 44 l एकूण पॉझिटिव्ह नोंदीत रूग्ण संख्या - 484
l विभागनिहाय कोरोना पॉझिटिव्ह नोंदीत संख्या : बेलापूर - 03, नेरूळ - 04, वाशी - 10, तुर्भे - 07,
कोपऱखैरणे - 09, घणसोली - 09, ऐरोली - 01, दिघा - 01.
----------------------------------------------------------------------
l सेक्टर 11 सीबीडी बेलापूर येथील रहिवाशी असलेल्या व मुंबईतील मानखुर्दहून आल्यामुळे क्वारंटाईन असलेल्या 26 वर्षीय लेबर वर्क करणा-या कामगाराचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
l सेक्टर 23 घणसोली येथील निवासी व मुंबईतील वरळी येथून मुलीकडून नवी मुंबईत आल्यामुळे स्वॅब टेस्ट केलेल्या 65 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l यादवनगर ऐरोली येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील व्यक्तींच्या स्वॅब तपासणीमधून त्यांचे 46 वर्षीय ट्रक ड्रायव्हर पतीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 4 घणसोली येथील रहिवाशी असणा-या 39 वर्षीय एल.आय.सी. एजन्टचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 15 वाशी येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. मार्केटमधील पॉझिटिव्ह व्यापारी यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींच्या स्वॅब तपासणीमधून त्यांच्या 83 वर्षीय आईचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.
l सेक्टर 10 नेरूळ येथील रहिवाशी असणा-या 30 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या जुईनगर येथील कोरोना पॉझिटिव्ह मृत काकांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींच्या स्वॅब तपासणीमधून त्यांच्या पुतण्याचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l कातकरीपाडा रबाळे येथील रहिवाशी व ऐरोली येथील इंद्रावती रूग्णालयात नर्स असणा-या 30 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या ठाणे येथील व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील व्यक्तींच्या टेस्टमधून यांचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.
l सेक्टर 46, नेरूळ येथील रहिवाशी व नेरूळ 1 येथील महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात फार्मासिस्ट म्हणून कार्यरत असणा-या 49 वर्षीय कर्मचा-याचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 36 करावेगाव येथील रहिवाशी व नेरूळ 2 येथील महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात बहुउद्देशीय आरोग्य सेवक म्हणून कार्यरत असणा-या 31 वर्षीय कर्मचा-याचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 26 कोपरीगाव येथील रहिवाशी व एपीएमसी भाजी मार्केट मधील 21 वर्षीय विक्रेते यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 11 कोपरखैरणे येथील रहिवाशी असलेल्या 17 वर्षीय मुलीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l एपीएमसी भाजी मार्केट, तुर्भे येथेच गाळ्यामध्ये राहणा-या 21 वर्षीय सेल्समनचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 26 कोपरीगाव येथील रहिवाशी व एपीएमसी मार्केट मधील सेल्समन असणा-या 48 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l नामदेवनगर दिघा येथील कोरोना पॉझिटिव्ह मृत व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींच्या स्वॅब तपासणीमधून 67 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 12 वाशी येथील रहिवाशी व एपीएमसी भाजी मार्केट मधील गाळाधारक 52 वर्षीय व्यापारी तसेच त्यांची 42 वर्षीय पत्नी, 20 वर्षीय मुलगी व 18 वर्षीय मुलगा अशा 4 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 16 वाशी येथील रहिवाशी व एपीएमसी फळ मार्केट मधील विक्रेते असणा-या 60 वर्षीय व्यक्तीचे व त्यांच्या दीड वर्षाच्या नातवाचे अशा 2 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 15 वाशी येथील रहिवाशी व एपीएमसी फळ मार्केट मधील विक्रेते असणा-या 67 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 15 वाशी येथील रहिवाशी व भायखळा, मुंबई येथे सब इन्सपेक्टर असणा-या 34 वर्षीय महिला पोलीस इन्सपेक्टरचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 15 वाशी येथील रहिवाशी व एपीएमसी भाजी मार्केट मधील 52 वर्षीय कामगार व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l तळवलीगाव येथील रहिवाशी असणा-या 43 वर्षीय महिलेचे आणि तिच्या 16 वर्षीय मुलाचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. मुंबई येथील डॉक्टरमुळे कोरोना बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींच्या स्वॅब तपासणीमधून या 2 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.
l सेक्टर 6 कोपरखैरणे येथील रहिवाशी व कुरिअर पोहचविण्याचे काम करणा-या 37 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.
l सेक्टर 6 कोपरखैरणे येथील रहिवाशी आणि कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या कुरिअर पोहचविण्याचे काम करणा-या 37 वर्षीय व्यक्तीचे व त्याच्या 27 वर्षीय पत्नीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.
l खैरणेगाव येथील रहिवाशी व कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 55 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.
l सेक्टर 1 घणसोली येथील रहिवाशी व धारावी येथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत 53 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 7 घणसोली येथील रहिवाशी व एपीएमसी मार्केट मधील 28 वर्षीय कामगार व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 1 घणसोली येथील रहिवाशी असणा-या 25 वर्षीय महिला आय.टी.इंजिनियरचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l चिंचआळी घणसोली येथील रहिवाशी असलेल्या 40 वर्षीय मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 20 कोपरखैरणे येथील रहिवाशी व एपीएमसी मार्केटबाहेरील फळविक्रेतेच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब टेस्टींग केले असता त्यामधून त्याच्या 62 वर्षीय वडिलांचे, 59 वर्षीय आईचे व 5 वर्षीय मुलीचे अशा 3 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 2 कोपरखैरणे येथील रहिवाशी असणा-या व कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 26 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 20 तुर्भे येथील रहिवाशी असणा-या 26 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 21 तुर्भे येथील रहिवाशी व एपीएमसी भाजी मार्केटमधील 40 वर्षीय व्यापारी यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 1 ए शिरवणे येथील रहिवाशी असणा-या व कोरोना पॉझिटिव्ह पोलीस नातेवाईकाच्या संपर्कात आलेल्या 22 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 22 जुईनगर येथील रहिवाशी व मुंबईत कार्यरत कोरोना पॉझिटिव्ह पोलीसाच्या 3 वर्षीय मुलीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l शिरवणेगांव येथील रहिवाशी व कोरोना पॉझिटिव्ह बीईएसटी बस कन्डक्टरच्या 6 वर्षीय मुलाचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 12 ए कोपरखैरणे येथील 68 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 9 सानपाडा येथील 82 वर्षीय डायबिटीस व ब्लडप्रेशरचा त्रास असणा-या व्यक्तीस छातीत दुखू लागून अत्यवस्थ वाटू लागल्याने सानपाडा येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्या प्रकृतीची गंभीर परिस्थिती पाहून त्यांस एम.जी.एम. रूग्णालय वाशी येथे दाखल करण्यासाठी घेऊन जात असतानाच छातीतील दुखणे वाढत जाऊन त्यांचे रूग्णवाहिकेतच निधन झाले. त्यामुळे त्यांना वाशी येथील महानगरपालिका रूग्णालयात आणण्यात आले. त्यांचे मरणोत्तर स्वॅब टेस्ट केले असता त्यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
|