*30 महापालिका अधिकाऱ्यांची उच्च पदांवर पदोन्नती*
जनतेला अभिप्रेत असलेली नागरी सुविधा कामे करताना त्यांच्या दर्जाकडेही लक्ष असणे अपेक्षित असून लोकाभिमुख प्रशासन राबविताना सेवासुविधा पुरविण्याचे काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचे सक्षमीकरणही गरजेचे आहे. त्या अनुषंगाने मागील 6 महिन्यात पदोन्नती, आश्र्वासित प्रगती योजना, लाड पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी असे मागील अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी पुढाकार घेऊन प्रशासनाला निर्देश देत मोठ्या प्रमाणावर मार्गी लावलेले आहेत.
मागील 6 महिन्यांत 24 विविध संवर्गातील 141 अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे. यामध्ये आज आणखी 30 उच्च पदांवर पदोन्नती देण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांचेमार्फत निर्गमित करण्यात आले आहेत.
यामध्ये 6 प्रशासकीय अधिकारी पदावर कार्यरत अधिकाऱ्यांची सहा. आयुक्त पदावर पदोन्नती करण्यात आलेली आहे.
22 अधिक्षक / वसूली अधिकारी पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांची प्रशासकीय अधिकारी पदावर पदोन्नती करण्यात आलेली आहे.
तसेच 2 सहा. अग्निशमन केंद्र अधिकारी यांची अग्निशमन केंद्र अधिकारी पदावर पदोन्नती करण्यात आलेली आहे.
एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने करण्यात आलेल्या या पदोन्नतीमुळे महापालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाकडून आनंद व्यक्त केला जात असून याद्वारे कार्यालयीन कामकाजात गतीमानता येणार आहे. यामुळे अधिकारी, कर्मचारी अधिक जोमाने काम करतील व यामधून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा पुरविल्या जातील असा विश्वास महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला आहे.
Published on : 20-03-2022 13:34:50,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update