*आज पहिल्याच दिवशी 621 आरोग्यकर्मी, कोरोना योध्दे, सहव्याधीग्रस्त ज्येष्ठांनी घेतला प्रिकॉशन डोसचा लाभ*
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज 10 जानेवारीपासून आरोग्यकर्मी (HCW), पहिल्या फळीतील कोरोना योध्दे (FLW) तसेच सहव्याधी (Comorbid) असणारे 60 वर्षावरील नागरिक यांना "प्रिकॉशन डोस" देणाबाबत प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार आज पहिल्याच दिवशी 621 नागरिकांनी प्रिकॉशन डोसचा लाभ घेतला आहे. महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने वाशी, नेरुळ व ऐरोली येथील तिन्ही सार्वजनिक रुग्णालये आणि तुर्भे येथील माता बाल रुग्णालय त्याचप्रमाणे 23 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांमध्ये प्रिकॉशन डोस उपलब्ध करून दिले होते. सकाळपासूनच प्रिकॉशन डोस घेण्यासाठी सर्वच केंद्रांवर लाभार्थ्यांचा उत्साह दिसून आला.
कोव्हीडचा दुसरा डोस घेऊन 9 महिने किंवा 39 आठवडे झालेल्या म्हणजेच ज्यांनी 12 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यापूर्वी कोव्हीड लसीचा दुसरा डोस घेतला असेल अशा आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच सहव्याधी असणारे 60 वर्षावरील नागरिक यांना आज 10 जानेवारी रोजी प्रिकॉशन डोस देण्यात आला.
यामध्ये 299 आरोग्यकर्मी (HCW), 206 पहिल्या फळीतील कोरोना योध्दे (FLW) तसेच 116 सहव्याधी (Comorbid) असणारे 60 वर्षावरील नागरिक यांनी प्रिकॉशन डोस घेतला. उद्या दि.11 जानेवारी 2022 रोजी प्रिकॉशन डोस या 27 केंद्रांवर दिले जाणार असून 13 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यापूर्वी कोव्हीड लसीचा दुसरा डोस घेतला आहे अशा आरोग्यकर्मी (HCW), पहिल्या फळीतील कोरोना योध्दे (FLW) तसेच सहव्याधी (Comorbid) असणारे 60 वर्षावरील नागरिक यांना प्रिकॉशन डोस दिला जाणार आहे.
कोव्हीडपासून संरक्षणाच्या दृष्टीने प्रिकॉशन डोस महत्वाचा असून सर्व लाभार्थ्यांनी योग्य वेळी प्रिकॉशन डोस घ्यावा आणि प्रिकॉशन डोस घेतल्यानंतरही कोव्हीड पासून संरक्षणाची मास्क हीच सर्वात मोठी ढाल आहे हे लक्षात घेऊन मास्कचा नियमित वापर करावा व कोव्हीड नियमावलीचे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 11-01-2022 08:30:42,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update