*9 लाख नवी मुंबईकरांनी घेतला कोव्हीड लसीचा पहिला डोस* *उद्या 8 सप्टेंबरला 100 लसीकरण केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोव्हीड लसीचा पहिला डोस*
ऑगस्ट महिन्यापासून कोव्हीड लसीचा पुरवठा पुरशा प्रमाणात उपलब्ध झाल्याने 8 ऑगस्टपासून 25 ऑगस्ट पर्यंत 18 दिवसात 1 लाखाहून अधिक नागरिकांनी तसेच 25 ऑगस्टपासून 6 सप्टेंबरपर्यंत 13 दिवसात 93290 नागरिकांचे लसीकरण होऊन आत्तापर्यंत 9 लाख 705 नवी मुंबईकरांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस तसेच 3 लाख 86 हजार 804 नागरिकांनी कोव्हीड लसीचा दुसरा डोस घेतलेला आहे.
लसीच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याकडे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार दैनंदिन नियोजन केले जात असून दुस-या लसीचा कालावधी आलेल्या नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण होण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकऱण केंद्रांमध्ये वाढ करून जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरणाव्दारे संरक्षित करण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. अशाचप्रकारे उद्या दि.08 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस देण्याकरिता लसीकरण केंद्रात लक्षणीय वाढ करीत 100 लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
*नवी मुंबई महानगरपालिकेची लसीकरण केंद्रे व खाजगी रूग्णालयांतील केंद्रे याठिकाणी आत्तापर्यंत 9 लाख 705 नागरिकांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतला असून 3 लाख 86 हजार 804 नागरिक कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेत पूर्ण संरक्षित झालेले आहेत.* यामध्ये -
लसीकरण लाभार्थी
|
पहिला डोस
|
दुसरा डोस
|
डॉक्टर्स व इतर आरोग्यकर्मी (HCW)
|
34436
|
22913
|
पोलीस, सुरक्षा. स्वच्छता व इतर पहिल्या फळीतील कोरोना योध्दे (FLW)
|
30804
|
21749
|
60 वर्षावरील नागरिक (60+)
|
88389
|
74763
|
45 ते 60 वयोगटातील नागरिक (45 to 60)
|
204804
|
137830
|
18 ते 45 वयोगटातील नागरिक (18 to 45)
|
542272
|
129549
|
एकूण
|
900705
|
386804
|
*अशाप्रकारे कोव्हीड लसीचे एकूण 12 लक्ष 87 हजार 509 डोस नागरिकांना देण्यात आलेले आहेत. म्हणजेच अपेक्षित लाभार्थीपैकी 85 टक्के नागरिकांनी पहिला डोस तसेच 36 टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरणाचे हे प्रमाण इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत अधिक आहे.*
*कोव्हीडची लागण झाल्यास लसीकरण झालेले असेल तर त्याची तीव्रता कमी होते. तथापि कोव्हीडची लागण होऊच नये याकरिता कोव्हीड लसीचे एक अथवा दोन्ही डोस घेतले असले तरी मास्कचा नियमित वापर करणे महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे घराबाहेर सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करणे, हात स्वच्छ ठेवणे, चेह-याच्या कोणत्याही भागाला स्पर्श न करणे अशा गोष्टी आपल्या नियमित सवयी बनविणेही गरजेचे आहे. विशेषत्वाने गणेशोत्सव कालावधीत नागरिकांनी कोव्हीड अनुरूप वर्तन (Covid Appropriate behaviour) राखणे व शासनाने उत्सवासाठी जाहीर केलेल्या नियमांचे पालन करणे अतिशय गरजेचे असून कोव्हीड लस उपलब्धतेनुसार त्वरीत लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.*
Published on : 07-09-2021 14:38:18,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update