10 जून रोजी सायंकाळी पाणी पुरवठा होणार नसल्याची सूचना
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत बुधवार दिनांक 10 जून 2020 रोजी मुख्य जलवाहिनी व भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील पावसाळापूर्व देखभाल दुरुस्तीची काम हाती घेण्यात येत आहेत. या कामासाठी जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बुधवार दि. 10 जून 2020 रोजी बंद ठेवावा लागणार आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावयाची आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात दिनांक 10 जून 2020 रोजी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्याचा व सिडको क्षेत्रातील कामोठे नोड मधील पाणी पुरवठा देखील बंद राहील. त्याचप्रमाणे गुरुवार दिनांक 11 जून 2020 रोजी या विभागांत कमी वेळ व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.
तरी याव्दारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, या कालावधीत पाण्याचा जपून वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे.
Published on : 09-06-2020 13:41:29,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update