1863 गौरींसह 11018 गणेशमुर्तींचे नवी मुंबई महानगरपालिकेच्या व्यवस्थित नियोजनामध्ये भावपूर्ण विसर्जन




गौरी-गणपतीचा सण संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. श्रीगणेशोत्सवात गौरींसह विसर्जित होणा-या मोठ्या प्रमाणावरील श्रीगणेशमूर्तींची संख्या लक्षात घेऊन महापालिका आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली 22 नैसर्गिक व 134 कृत्रिम अशा 156 विसर्जन स्थळांवर दीड व पाच दिवसांच्या विसर्जनापेक्षा अधिक चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. भाविकांच्या अलोट उत्साहामध्ये 156 विसर्जन स्थळांवर 1863 गौरींसह 11018 श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन सुव्यवस्थित रितीने संपन्न झाले.
गौरींसह मोठ्या प्रमाणात संपन्न होणा-या या गणेशोत्सवाच्या सहाव्या दिवशीच्या विसर्जन सोहळ्यात बेलापूर विभागात 5 विसर्जन स्थळांवर 1240 घरगुती व 13 सार्वजनिक गणेशमूर्ती आणि 169 गौरी, नेरूळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 1769 घरगुती व 2 सार्वजनिक गणेशमूर्ती आणि 232 गौरी, वाशी विभागात 2 विसर्जन स्थळांवर 570 घरगुती व 8 सार्वजनिक गणेशमूर्ती आणि 55 गौरी, तुर्भे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 658 घरगुती व 6 सार्वजनिक गणेशमूर्ती आणि 167 गौरी, कोपरखैरणे विभागात 2 विसर्जन स्थळांवर 843 घरगुती व 7 सार्वजनिक गणेशमूर्ती आणि 226 गौरी,, घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 249 घरगुती व 29 सार्वजनिक गणेशमूर्ती आणि 72 गौरी, ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 456 घरगुती व 14 सार्वजनिक गणेशमूर्ती आणि 122 गौरी, दिघा विभागात 1 विसर्जन स्थळावर 209 घरगुती व 10 सार्वजनिक गणेशमूर्ती व 55 गौरी अशाप्रमाणे एकुण 22 विसर्जन स्थळांवर 5994 घरगुती व 89 सार्वजनिक अशा एकूण 6083 श्रीगणेशमुर्तींचे व 1098 गौरींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले.
नैसर्गिक जलसंपदा जपणूकीच्या दृष्टीने नागरिकांनी सर्व आठही विभाग कार्यालय क्षेत्रात महानगरपालिकेने मोठ्या संख्येने तयार केलेल्या 134 कृत्रिम विसर्जन तलावात श्रीमूर्तींचे विसर्जन करावे या महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केलेल्या आवाहनाला पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या 134 कृत्रिम विस्रर्जन तलावात 4914 घरगुती व 21 सार्वजनिक अशा 4995 गणेशमूर्तींचे व 765 गौरींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये - बेलापूर विभागात 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 251 घरगुती व 4 सार्वजनिक गणेशमूर्तींचे आणि 204 गौरींचे, नेरूळ विभागात 24 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 411 घरगुती गणेशमूर्तींचे आणि 104 गौरींचे, वाशी विभागात 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 257 घरगुती व 3 सार्वजनिक गणेशमूर्तींचे आणि 74 गौरींचे, तुर्भे विभागात 17 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 366 घरगुती व 5 सार्वजनिक गणेशमूर्तींचे आणि 64 गौरींचे, कोपरखैरणे विभागात 15 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 1635 घरगुती व 1 सार्वजनिक गणेशमूर्तींचे आणि 361 गौरींचे, घणसोली विभागात 18 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 464 घरगुती व 2 सार्वजनिक गणेशमूर्तींचे आणि 466 गौरींचे, ऐरोली विभागात 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 1089 घरगुती व 6 सार्वजनिक गणेशमूर्तींचे आणि 82 गौरींचे तसेच दिघा विभागात 9 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 441 घरगुती गणेशमूर्तींचे आणि 20 गौरींचे अशाप्रकारे एकूण 134 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 4914 घरगुती व 21 सार्वजनिक अशा एकूण 4935 श्रीगणेशमुर्तींना आणि 765 गौरींना भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले.
अशाप्रकारे 22 नैसर्गिक व 134 कृत्रिम विसर्जन स्थळांवर उत्सवाच्या सहाव्या दिवशी 10908 घरगुती व 110 सार्वजनिक अशा एकूण 11018 श्रीगणेश मूर्तींना आणि 1863 गौरींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
विशेष म्हणजे कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिघा विभागातील नागरिकांनी पर्यावरणशील दृष्टीकोन जपत नैसर्गिक तलावांच्या तुलनेत कृत्रिम तलावांतील विसर्जनाला अधिक पसंती दिली. या विभागामध्ये नैसर्गिक तलावांपेक्षा साधारणत: दुपटीने व काही विभागांत तर दुपटीपेक्षा अधिक श्रीमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांत करण्यात आले.
गौरींसह विसर्जीत होणा-या श्रीगणेशमुर्तींची संख्या मोठ्या प्रमाणावर असते याचे भान ठेवून परिमंडळ १ चे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार व परिमंडळ २ चे उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगीरे यांच्यासह आठही विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या माध्यमातून नैसर्गिक व कृत्रिम विसर्जनस्थळांवर आवश्यक अशी सर्व व्यवस्था पुरविण्याकडे काटेकोर लक्ष देण्यात आले होते. त्यामुळे विसर्जनस्थळी आलेल्या गौरी-गणपतींचे अत्यंत भावपूर्ण वातावरणात सुव्यवस्थित रितीने विसर्जन संपन्न झाले. सर्व आठही विभागातील अधिकारी – कर्मचारी यांच्यासह अग्निशमन विभाग आणि विसर्जनासाठी नियुक्त केलेले स्वयंसेवक, लाईफ गार्डस् यांच्या माध्यमातून विसर्जन व्यवस्था सुरळीत पार पडली. अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनीही अनेक विसर्जन स्थळांना भेटी देऊन पाहणी केली.
श्रीमूर्ती विसर्जनाकरीता सर्व ठिकाणी तराफ्यांची तसेच मोठ्या मूर्ती असतात अशा आवश्यक ठिकाणी फोर्कलिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जनस्थळांवर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेसाठी बांबुचे बॅरेकेटींग करण्यात आले होते तसेच विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्याठिकाणी पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचार वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. भक्तजनांना व्यवस्थितरित्या श्रीमूर्तींची निरोपाची आरती व पूजा करण्यासाठी रांगेत टेबलची मांडणी करण्यात आली होती.
विसर्जनस्थळांपैकी ‘तलाव व्हिजन’ अंतर्गत सुशोभित करण्यात आलेल्या १४ मुख्य तलावांमध्ये गॅबियन वॉल निर्धारित क्षेत्रातच भाविकांनी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गौरी व श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन करून पर्यावरण जपणुकीच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या आवाहनास उत्तम सहकार्य दिले. संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून विसर्जनस्थळांवर सूचना व स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठामुळे भाविकांची गर्दी मोठी असूनही त्यांना आवश्यक सूचना देणे शक्य झाले व गर्दीचे नियोजन करणे तसेच विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने पार पाडण्यात मोलाची मदत झाली. सर्वच ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने महानगरपालिका अग्निशमन दलासह पोलीस यंत्रणाही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सज्ज होती.
विसर्जनस्थळांवर नागरिकांमार्फत श्रीमुर्तींसोबत आणले जाणारे पुष्पमाळा, फुले, दुर्वा, शमी यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे “ओले निर्माल्य” त्यासाठी स्वतंत्रपणे ठेवलेल्या निर्माल्य कलशातच टाकावे तसेच मुर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान, प्लास्टिक अशा “सुके निर्माल्य” स्वतंत्र कलशात टाकावे, कोणत्याही परिस्थितीत या वस्तू पाण्यात टाकू नयेत अशा महानगरपालिकेमार्फत करण्यात येणा-या आवाहनाला भाविकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. निर्माल्याची वाहतुक करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली असून हे निर्माल्य महानगरपालिकेच्या तुर्भे प्रकल्पस्थळी विशेष वाहनाव्दारे वाहून नेले जात आहे व त्याचे पावित्र्य जपत त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे श्रीमुर्तींसोबत आणली जाणारी फळे व खाद्य वस्तू भाविक स्वतंत्र कॅरेटमध्ये ठेवत असून त्यांचे नंतर गरजू मुलांना व नागरिकांना वितरण करण्यात येत आहे.
श्रीगणेशमुर्ती विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने संपन्न होण्यासाठी सर्वच 156 विसर्जन स्थळांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून पुढील सातव्या व दहाव्या दिवशीच्या विसर्जन सोहळ्यासाठी नागरिकांनी सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 06-09-2022 12:37:56,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update