2217 नागरिकांचे वाशी, घणसोली, दिघा विभागात कोव्हीड-19 मास स्क्रिनींग
कोव्हीड 19 चा प्रसार रोखण्यासाठी कोरोना बाधितांचा शोध घेण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोव्हीड 19 तपासणी मोहिम 26 मे पासून हाती घेण्यात आली आहे. या अनुषंगाने आज वाशी, घणसोली व दिघा परिसरात 2217 नागरिकांचे मा स्क्रिनींग करण्यात आले.
घणसोली नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तेरणा रुग्णालयाच्या वैद्यकीय समुहाने घरोंदा भागात 153 व्यक्तींचे मास स्क्रिनींग केले. व कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या 02 व्यक्तींचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले.
वाशी विभागात जुहुगांव नागरी आऱोग्य केंद्रासह डॉ. डि.वाय. पाटील रुग्णालयाच्या वैद्यकीय समुहाने सेक्टर 15, 16 परिसरात 102 नागरिकांची तसेच जुहुगांव परिसरात 165 नागरिकांची कोव्हीड 19 तपासणी केली तसेच कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या सेक्टर 15, 16 येथील 04 व जुहुगांव येथील 8 नागरिकांचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले.
त्याचप्रमाणे रामनगर दिघा विभागात इलठणपाडा महापालिका नागरी आरोग्य केंद्रासह अमृत प्रेरणा सेवाभावी संस्था यांच्या वैद्यकीय समुहाने घरोघरी जावून 1797 नागरिकांचे मास स्क्रिनींग केले.
उद्याही बुधवार दि. 17 जून रोजी नेरुळ विभागात शिरवणे व जुईनगर भागात तसेच वाशीगांव येथे कोव्हीड 19 मास स्क्रिनींग कॅम्प राबविण्यात येत आहेत.
नागरिकांनी कोरोनाच्या विषाणूला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी मास्कचा नियमित वापर करावा व सोशल डिस्टन्सींग राखावे आणि आपले हात नियमित धुवावेत असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 16-06-2020 15:31:50,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update