3285 नागरिकांचे ऐरोली, तुर्भे, दिघा भागात 5 ठिकाणी कोव्हीड 19 मास स्क्रिनींग
कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या संख्येने आढळले आहेत अशा भागांमध्ये महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोव्हीड 19 मास स्क्रिनींग मोहिम हाती घेण्यात आली असून आज ऐरोली सेक्टर 3 तसेच सेक्टर 6, 8 ऐरोली, दिवागांव, हनुमाननगर तुर्भे व दिघा अशा 5 भागांमध्ये मास स्क्रिनींगची मोहिम प्रभावी रितीने राबविण्यात आली. या 5 ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या तपासणीमध्ये एकूण 3285 नागरिकांची कोव्हीड 19 तपासणी करण्यात आली.
यामध्ये सेक्टर 6, 8ए ऐरोली विभागात महापालिका नागरी आऱोग्य केंद्रासह डॉ. डि.वाय. पाटील रुग्णालयाच्या वैद्यकीय समुहाने 125 नागरिकांची तपासणी केली तसेच कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या 03 नागरिकांचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले.
अशाच प्रकारे ऐरोली विभागातील दिवागांव परिसरात मास स्क्रिनींग कॅम्पमध्ये महापालिका नागरी आरोग्य केंद्रासह डॉ. डि.वाय. पाटील रुग्णालयाच्या वैद्यकीय समुहाने 147 नागरिकांचे मास स्क्रिनींग केले.
तसेच ऐरोली विभागात सेक्टर 3 येथे मास स्क्रिनींग कॅम्पमध्ये महापालिका नागरी आरोग्य केंद्रासह डॉ. डि.वाय. पाटील रुग्णालयाच्या वैद्यकीय समुहाने 244 नागरिकांचे मास स्क्रिनींग केले. तसेच कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या 15 नागरिकांचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले.
हनुमाननगर, तुर्भे भागात महापालिका नागरी आरोग्य केंद्र यांच्यासह अमृत प्रेरणा सेवाभावी संस्था यांच्या वैद्यकीय समुहाने 2697 नागरिकांचे मास स्क्रिनींग केले. तसेच कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या 02 नागरिकांचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले.
त्याचप्रमाणे बिंदुमाधव नगर, दिघा येथील मास स्क्रिनींग कॅम्पमध्ये महापालिका नागरी आरोग्य केंद्रासह तेरणा हॉस्पिटलच्या वैद्यकीय समुहाने 72 नागरिकांचे मास स्क्रिनींग केले. तसेच कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या 07 नागरिकांचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले.
या कोव्हीड 19 तपासणी मोहिमेव्दारे कोरोनाच्या अनुषंगाने नागरिकांची विशेष तपासणी केली जात असून याव्दारे कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी उपयोग होत आहे. गुरुवार दि. 11 जून रोजी सेक्टर 10 नेरुळ येथे तसेच ऐरोली विभागात यादव नगर, सेक्टर 19 ऐरोली आणि सेक्टर 16 ऐरोली या 3 ठिकाणी त्याचप्रमाणे हनुमान नगर तुर्भे अशा एकूण 5 ठिकाणी कोव्हीड 19 विशेष मास स्क्रिनींग मोहीम राबविली जाणार आहे.
नागरिकांनीही मास्कचा नियमित वापर करून व सोशल डिस्टन्सींगचे पालन करून कोरोनाच्या विषाणूला आपल्यापासून दूर ठेवावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री.अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 10-06-2020 14:45:27,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update