8 मार्च, 2022 जागतिक महिला दिनानिमित्त महिलांकरीता ऑनलाईन स्पर्धा आयोजन
नवी मुंबई महानगरपालिका समाज विकास विभागाच्या वतीने दि. 8 मार्च, 2022 रोजीच्या जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला, मुली, महिला बचत गट, महिला मंडळे, महिला संस्था यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याकरिता विविध स्पर्धांचे ऑनलाईन आयोजन करण्यात येत आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे -
· विविध स्पर्धांसाठी रजिस्ट्रेशन लिंक दि. 1 ते 5 मार्च 2022 पर्यंत खुल्या राहतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावयाची आहे.
स्पर्धेविषयीची सविस्तर माहिती, अर्ज, नियम, अटी व शर्ती नवी मुंबई महानगरपालिकेच्या @NMMConline या फेसबुक पेजवर किंवा @NMMConline या ट्विटर पेजवर अथवा @nmmconline या ट्विटर पेजवर उपलब्ध असून व्हॉट्स ॲप क्रमांक क्रमांक 9137081343 यावर ऑनलाईन स्पर्धेकरिता तयार केलेली व्हिडिओ क्लिप / फोटो पाठवावयाची आहे. या स्पर्धांमध्ये फक्त नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणा-या महिला व मुली सहभाग घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी बेलापूर, नेरुळ विभाग - श्री. दादासाहेब भोसले - 9372106976, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे विभाग - श्री. दशरथ गंभीरे - 9702309054 आणि घणसोली, ऐरोली, दिघा विभाग - श्री. प्रकाश कांबळे - 9969008088 यांचेशी संपर्क साधावयाचा आहे.
Published on : 28-02-2022 16:25:41,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update