आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात आपत्ती विषयक जनजागृती करणे
अधिकारी, कर्मचारी नागरीक, अशासकिय संस्थाचे प्रतिनिधी महाविद्यालयीन विद्यार्थी यांचेकरीता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे
आपत्ती मुळे निर्माण झालेले डेब्रिज तातडीने उचलून नेनेसाठी संबंधित विभागास कळविणे, वाहतुकीकरीता योग्य ती सोय करणे, तात्पुरते तातडीचे कच्चे रस्ते बनविणेसाठी संबंधित विभागास कळविणे, त्याचबरोबर झालेले मनुष्यहानी, वित्तहानी यांचे मुल्यांकन करून त्याचे अहवाल तयार करणे
त्याचप्रमाणे, आपत्तीच्या वेळेस विभाग अधिकारी यांच्यामार्फत नागरीकांना अन्न-धान्य, तेल व पेयजलाची व्यवस्था करणे
आपत्ती मुळे बाधीत झालेल्या लोकांना मदत पुर्नवसन शासनाकडून प्राप्त झालेल्या मदतीचे वाटप करणे, तात्काळ आवश्यक असलेले वस्तु खरेदी करणे, त्याचा लेखा जोखा ठेवणे, त्याचबरोबर राज्य आपत्ती पुर्नवसन व राष्ट्रीय आपत्ती पुर्नवसन निधी यांचेकडून निधी उपलब्ध करून घेणे, आपत्तीच्या ठिकाणी बाधित लेाकांची अन्न, वस्त्र निवाऱ्याची सोय करणे.
आपत्ती मुळे बाधीत झालेल्या रुग्णांना वैद्यकिय सुविधा उपलब्ध करून देणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, वैद्यकिय पथक व औषध पुरवठ्यांची योग्य ती तपासणी करून त्यासंबंधी समन्वय साधणे.
आपत्ती काळात सापडलेल्या नागरीकांना शहरात उपलब्ध असलेल्या वाहतुकीचे नियोजन तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्यांच्या गंतव्य स्थानापर्यंत पोहचविण्याची मदत नमुंमपा परिवहन उपक्रम महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, खाजगी वाहतुक, रेल्वे, इ. बरोबर संपर्क साधणे. त्याच बरोबर पोलिस वाहतुक शाखा मदतीने वाहतुक व्यवस्था करणे.