नागरिकांसाठी आवश्यक छोटया नागरी सुविधा कामांकडेही आयुक्तडॉ. रामास्वामी एन. यांचे विशेष लक्ष
नागरिकांसाठी आवश्यक छोटया नागरी सुविधा कामांकडेही आयुक्तडॉ. रामास्वामी एन. यांचे विशेष लक्ष
नवी मुंबईकर नागरिकांना अपेक्षित कार्यपूर्तता करण्याकडे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे विशेष लक्ष असून तशा प्रकारच्या सूचना त्यांनी सर्वच महापालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाला दिलेल्या आहेत. या अनुषंगाने बेलापूर विभागातील सेक्टर-1 सुनिल गावस्कर मैदानात बांधण्यात आलेल्या गटारापेक्षा मैदानाबाहेरील जुने गटार आकाराने लहान असल्याने मैदानातील पाण्याचा निचरा विशेषत: पावसाळी कालावधीत व्यवस्थित होत नाही व मैदानातील पाणी रस्त्यावर येऊन रस्ता खराब होतो तसेच नागरिकांना त्रास होतो. यादृष्टीने सुनिल गावस्कर मैदानाजवळील गटार व पदपथ सुधारणा कामाकरीता आयुक्तांची मंजूरी प्राप्त् झालेली आहे.
अशाच प्रकारे सेक्टर-9 एन, सी.बी.डी बेलापूर येथील नागरी आरोग्य केंद्राच्या इमारतीची डागडूजी करणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन त्याठिकाणी इमारत दुरुस्ती व रंगरंगोटी करण्याचे काम करण्यात येत आहे. या नागरी आरोग्य केंद्राचा लाभ विशेषत्वाने सेक्टर-2,3,9 व 9 एन परिसरातील नागरिकांना होत असल्याने या कामाचे महत्व लक्षात घेऊन त्यासही आयुक्तांनी मंजूरी दिली आहे.
सानपाडा सेक्टर-10 येथे भूखंड क्र.187 वरील समाज मंदिराजवळील भागात गटारे नसल्यामुळे पावसाळी कालावधीत पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने पाणी साचून नागरिकांना त्रास होतो. हा त्रास दूर करण्यासाठी त्या ठिकाणी ड्रेनेजचे काम करण्यास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची मंजूरी प्राप्त् झाली असून त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या पदपथाचाही उपयोग नागरिकांना होणार आहे.
तुर्भे सेक्टर -19 डी येथील संत निरंकारी सत्संग भवनजवळ नागरिकांना व वाहनांना त्या भागात दिवाबत्ती नसल्याने अंधाराचा त्रास होत होता. हा त्रास दूर करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी दिवाबत्तीची व्यवस्था करण्यास आयुक्तांनी मंजूरी दिलेली आहे.
सेक्टर – 4 नेरुळ येथील सागरसंगम सोसायटी समोरील बाजूस भूखंड क्र.30 पर्यंत रस्त्यालगत फेनसिंग बसविण्यास आयुक्तांची मंजूरी प्राप्त् झाली असून या ठिकाणी मोठया प्रमाणावर डेब्रिज टाकले जात असल्याने परिसर स्वच्छतेच्या दृष्टीनेही हे काम महत्त्वाचे आहे.
नवी मुंबईकर नागरिक सकाळी व संध्याकाळी मोठया प्रमाणावर जॉगिंगसाठी उदयानांमध्ये येत असून त्यांना अधिक आधुनिक सुविधा मिळाव्यात यादृष्टीने नेरुळ से.21 येथील रेणुकाचार्य उदयानात नागरिकांच्या शारीरिक फिटनेसच्या दृष्टीने वॉल क्लायबिंगची सुविधा उपलब्ध् करुन दिली जात आहे. यासाठी स्ट्रक्चरल शेड बांधणे व अनुषांगिक कामे करण्यास आयुक्तांनी मंजूरी दिली आहे.
त्याचप्रमाणे पामबीच मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी कोपरी चौक ते एमएससीबी चौक् सिटी मॉल जवळ नविन ट्रॅफिक सिग्नल आयुक्तांच्या मंजूरीने लावण्यात येत आहे. एपीएमसी वाहतूक पोलीस शाखेचीही याकरीता वारंवार मागणी होती.
शिक्षण व्हिजनच्या अनुषंगाने गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देताना आजच्या माहिती तंत्रयुगाला साजेशा सुविधाही विदयार्थ्यांना उपलब्ध् करुन देण्याकडे आयुक्त् डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या शाळा डिजीटलायझेशन करण्यावर विशेष लक्ष दिले जात असून या अनुषंगाने से-5 कोपरखैरणे येथील नमुंमपा शाळा क्र.35 मध्ये तसेच पावणे गाव येथील नमुंमपा शाळा क्र.33 मध्ये त्याचप्रमाणे खैरणे गाव येथील उर्दू शाळा क्र.81 मध्ये संगणक कक्ष तयार करुन अनुषांगिक कामे करण्यास आयुक्तांची मान्यता लाभली आहे.
याशिवाय से.6,7 ऐरोली येथील नमुंमपा शाळा क्र.91,48 या शाळेची सुधारणा कामे व रंगरंगोटी करुन शिक्षणासाठी प्रोत्साहक वातावरण निर्माण करण्यास तसेच हनुमाननगर कोपरखैरणे येथील शाळा क्र.39 ची स्थापत्यविषयक सुधारणा कामे तसेच रंगरंगोटी करण्यास आयुक्तांनी प्राधान्याने मान्यता दिलेली आहे.
अशा प्रकारे छोटया छोटया नागरी सुविधांची पूर्तता करण्याकडेही महापालिका आयुक्त् डॉ. रामास्वामी एन. यांचे विशेष लक्ष आहे.