«Back

महापालिका वर्धापनदिनानिमित्त नगरसेवक, अधिकारी, पत्रकार यांच्या प्रेक्षणीय क्रिकेट लढती

महापालिका वर्धापनदिनानिमित्त नगरसेवक, अधिकारी, पत्रकार यांच्या प्रेक्षणीय क्रिकेट लढती

 

      नवी मुंबई महानगरपालिका 27 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी महापालिका पदाधिकारी - नगरसेवक, न.मुं.म.पा. अधिकारी वर्ग तसेच पत्रकार यांच्यामध्ये प्रेक्षणीय क्रिकेटसामन्यांचे दि. 28 डिसेंबर 2018 रोजी भारतरत्न स्व.राजीव गांधी क्रीडा संकुल, से.3, सी.बी.डी.,बेलापूर, नवी मुंबई येथे आयोजन करण्यात आलेले होते.

      या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन महापौर श्री जयवंत सुतार यांचे शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी सभागृह नेते श्री.रविंद्र इथापे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती श्री मुनवर पटेल व उपसभापती श्री गिरीश म्हात्रे,  नगरसेवक श्री.सोमनाथ वास्कर, श्री.करण मढवी, श्री.ज्ञानेश्वर सुतार व इतर नगरसेवक तसेच क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त श्री नितीन काळे व समाजविकास विभागाचे उप आयुक्त श्री. अमोल यादव उपस्थित होते.

      सदर सामन्यामध्ये पहिला सामना नमुंमपा अधिकारी व पत्रकार या दोन संघांमध्ये झाला. अधिकारी संघाने प्रथम फलंदाजी करीत4 षटकांमध्ये 1 गडी बाद 48 धावा करीत पत्रकार संघासमोर 49 धावांचे लक्ष्य ठेवले. या धावांचा पाठलाग करताना पत्रकार संघाने 4 षटकांमध्ये 4 गडी गमावून 43 धावा केल्या. अशाप्रकारे पहिल्या सामन्यात अधिकारीवर्ग संघाने विजय संपादन केला.

        दुसरा सामना नमुंमपा अधिकारीवर्ग संघ व पदाधिकारी-नगरसेवक यांच्यामध्ये झाला. या सामन्यात पदाधिकारी-नगरसेवक संघाने प्रथम फलंदाजी करीत 2 गडी बाद 34 धावा केल्या. हे 35 धावांचे लक्ष्य पार करीत अधिकारी संघाने हा सामना 6 गडी व 2 चेंडू राखून जिंकला आणि या प्रेक्षणीय त्रिलढतींचे विजेतेपद पटकावले.