«Back

रा.फ.नाईक महाविद्यालयात स्वच्छतेविषयी विद्यार्थी प्रबोधन

रा.फ.नाईक महाविद्यालयात स्वच्छतेविषयी विद्यार्थी प्रबोधन

               ‘स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून रा.फ.नाईक महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांकडून स्वच्छता ॲप (Swachhta-MoHUA App) डाऊनलोड करुन  घेऊन ॲप वापरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्वच्छता ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या परिसरामधील व दैनंदिन स्वच्छताविषयक 16 तक्रारींबाबत माहिती देण्यात आली. ॲपवर दाखल करण्यात आलेल्या तक्रारींचे 24 तासाच्या आत महानगरपालिकेच्या वतीने निराकरण केले जात असून याविषयीच्या कार्यप्रणालीचीही माहिती सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली.

                 यासोबतच विद्यार्थ्यांना ‘स्वच्छ सर्वेक्षण 2019' विषयी तसेचसुका कचरा व ओला कचरा याचे निर्मितीच्या ठिकाणीच वर्गीकरण करणे, उघड्यावर शौचास न जाता सार्वजनिक व सामुदायिक शौचालयाचा वापर करणे याविषयी  मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे कोपरखैरणे विभागातील स्वच्छता अधिकारी श्री. दिनेश वाघुळदे, रा.फ. नाईक शाळेचे प्राचार्य श्री. प्रताप महाडीक, स्वच्छता निरीक्षक श्री. पवन कोवे, उपस्वच्छता निरीक्षक श्री.संजीव बेंडाले, श्री. दिनेश पाटील, श्री.महेंद्र महाडीक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी स्वच्छग्राही व विद्यार्थी मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.