परिवहन विभाग
विभागामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा
  • नवी मुंबई महानगरपालिका संचलित अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्रासाठी मुकबधिर व कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी शाळा ते निवास्थान या दरम्यान बस सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
  • शैक्षणिक सहली व शालेय कार्यक्रम यासाठी आरक्षण दरावर बसेस उपलब्ध करू देण्यात येत आहेत.
  • विद्यार्थी पालक संघ किंवा शाळा/विद्यालय यांचे मागणीनुसार विद्यार्थ्यांचे निवास स्थान ते शाळा/विद्यालय या दरम्यान विद्यार्थी वाहतूकीसाठी खास बस फेऱ्यांची सुविधा देण्यात येत आहेत.
  • पोलीस प्राधिकारी, गृह रक्षक दल, शासकीय कामकाज, महापालिका कामकाज यासाठी विहित केलेल्या दरानुसार मागणीनुसार व आवश्यकतेनुसार बसेस उपलब्ध करुन देण्यात येतात.
  • सर्व प्रकारच्या सार्वजनिक निवडणूकांसाठी विहित केलेल्या दरानुसार मागणीनुसार व आवश्यकतेनुसार बसेस उपलब्ध करुन देण्यात येतात.
  • चित्रपट व टि.व्ही.सिरीयल चित्रिकरणासाठी विहित करण्यात आलेल्या आरक्षित दराने बसेस उपलब्ध करून देण्यात येतात.
  • विविध संस्था किंवा कंपणी यांचे मागणीनुसार मासिक शुल्कावर बस सेवा उपलब्ध करून देण्यात येते.
  • नमुंमपा कार्यक्षेत्रातील रिक्षा, टॅक्सी, इतर परिवहन संस्था यांनी पुकारलेल्या संपकाळात उपक्रमामार्फत प्रवाशांना जास्तीत जास्त बसेस उपलब्ध करुन देण्यात येतात.
  • नैसर्गिक आपत्ती व तद्अनुषंगिक घटना घडल्यास उपक्रमामार्फत तात्काळ जादा बस सेवा उपलब्ध करून देण्यात येते.
Last updated on : 18/10/2016 17:10