*सुप्रसिध्द साहित्यिक श्री. उत्तम कांबळे यांचे 30 डिसेंबरला "ग्रंथ घडविती माणूस" या विषयावर व्याख्यान*
सेक्टर 15 ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक याठिकाणचे इ लायब्ररीसह समृध्द ग्रंथालय, चरित्र छायाचित्र दालन तसेच इतर विविध सुविधा वैशिष्ट्यपूर्ण असून बाबासाहेबांच्या ज्ञानसूर्य उपमेला साजेसे उपक्रम याठिकाणी राबविले जावेत ही भूमिका नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जपण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून याठिकाणी मान्यवर वक्त्यांची विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित करून वैचारिक व्यासपीठ निर्माण करणे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला ज्ञानसंपदेचा वारसा जोपासला जात आहे.
या अनुषंगाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा सुप्रसिध्द साहित्यिक श्री. उत्तम कांबळे यांचे "ग्रंथ घडविती माणूस" या विषयावर गुरुवार, दि. 30 डिसेंबर 2021 रोजी सायं. 5 वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सेक्टर 15 ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करून मर्यादित उपस्थितीत हा व्याख्यान उपक्रम संपन्न होणार असून या माध्यमातून ग्रंथ वाचक व अभ्यासकांना विचारधन लाभणार आहे.
Published on : 29-12-2021 12:08:07,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update