*कोपरखैरणे विभागातील अनधिकृत बांधकामावर कारवाई*
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभागांतर्गत भूखंड क्र.1 बी व 1 सी च्या पाठीमागे रेल्वे ट्रॅकच्या बाजूला सेक्टर-4ए, कोपरखैरणे, नवी मुंबई याठिकाणी महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे आर.सी.सी. स्वरूपाचे बांधकाम सुरू केले होते. या अनधिकृत बांधकामास कोपरखैरणे विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती, परंतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.
सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करून सुरू असलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी / कर्मचारी, 06 मजूर, 01 गॅस कटर, 04 ब्रेकर, 1 जे.सी.बी, कारवाई करीता वापर करण्यात आले. तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस पथक तैनात होते.
यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 20-09-2022 14:41:45,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update