बेलापूर विभागातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अे विभाग बेलापूर कार्यालयाअंतर्गत शहाबाज गांव नवी मुंबई येथे तळमजला + दोन मजल्याचे बांधकाम विनापरवानगीने अनधिकृतपणे बांधले असून नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे काम सुरु केले होते.
या अनधिकृत बांधकामास अे विभाग बेलापूर कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविने आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
त्यामुळे या अनधिकृत बांधकामावर अे विभाग बेलापूर कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी अे विभाग कार्यालय बेलापूर मधील अधिकारी / कर्मचारी, मजूर - 08, गॅस कटर - 01, इलेक्ट्रीक हॅमर 01, जेसिबी तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस तैनात होते.
यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 19-04-2023 11:24:39,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update