*10 जूनला होणारे दिव्यांगांचे विशेष लसीकरण सत्र अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे पुढे ढकलण्यात आलेले आहे* *10 जूनला महानगरपालिकेच्या कोणत्याही केंद्रावर लसीकरण होणार नाही*
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 18 वर्षावरील दिव्यांगाकरिता 10 जून 2021 रोजी 3 रूग्णालयात आयोजित करण्यात आलेले विशेष लसीकरण सत्र आज पहाटेपासून मोठ्या प्रमाणावर झालेला पाऊस बघता तसेच हवामान खात्याने 10 ते 12 जून 2021 या कालावधीत दिलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता दिव्यांगाना कोणत्याही प्रकारची अडचण व त्रास होऊ नये म्हणून पुढे ढकलण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात येत आहे. दिव्यांगांच्या लसीकरणाची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.
त्याचप्रमाणे उद्या दि. 10 जून 2021 रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्या कोणत्याही लसीकरण केंद्रांवर लसीकरणाची नियमित सत्रेही होणार नाहीत याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. लसीकरणाच्या यापुढील सत्र आयोजनाबाबत सूचना जाहीर करण्यात येईल.
Published on : 09-06-2021 15:12:27,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update