नमुंमपा शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2020-21 करीता प्रवेश प्रक्रिया
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व पालकांना कळविण्यात येते की, नवी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दु व इंग्रजी (स्टेट बोर्ड) च्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी पूर्वप्राथमिक व इयत्ता 1ली ते इयत्ता 10वी करीता नि:शुल्क प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका शाळांच्या सुसज्ज इमारती असून यामध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाते. महानगरपालिकेमार्फत विद्यार्थ्यांसाठी विमा योजनेचे संरक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना ईलर्निंग व स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून शिक्षण दिले जात असून सध्यस्थितीत लॉकडाऊनच्या कालावधीत Youtube चॅनेल मार्फत ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तरी इच्छूक पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश ऑनलाईन (संबंधित शाळेच्या Google Form) मध्ये किंवा ऑफलाईन आपल्या नजीकच्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये फॉर्म भरून निश्चित करावा.
Published on : 20-07-2020 13:04:01,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update