“परीक्षा पे चर्चा – पर्व 6 अंतर्गत चित्रकला स्पर्धा
मा.पंतप्रधानांच्या संकल्पनेतील “परीक्षा पे चर्चा” कार्यक्रमातंर्गत आज बुधवार, दिनांक 25/01/2023 रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांकरिता चित्रकला स्पर्धेचे आयोजन नेरुळ येथील यशवंतराव चव्हाण मैदान तसेच कोपरखैरणे येथील निसर्ग उदयान येथे करणेत आले होते. स्पर्धेची वेळ सकाळी 8.00 ते 11.00 अशी होती.
मा.शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी व्हीडीओ कॉन्फरन्स मध्ये परीक्षा पे चर्चा ही राज्यव्यापी चित्रकला स्पर्धा विधानसभानिहाय आयोजित करणेत बाबत सुचना देण्यांत आल्या होत्या. त्या अनुषंगाने नवी मुंबई क्षेत्रातील परिमंडळ 2 साठी निसर्ग उदयान कोपरखैरणे येथे स्पर्धा आयोजित करणेत आली होती. या स्पर्धेसाठी अंदाजे 1607 इतक्या संख्येने विदयार्थी उपस्थित होते.
तसेच परिमंडळे 1 साठी यशवंतराव चव्हाण मैदान नेरुळ येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करणेत आली होती. या स्पर्धेसाठी अंदाजे 1189 इतक्या संख्येने विदयार्थी उपस्थित होते.
स्पर्धेसाठी विषय केंद्र स्तरावरुन निर्गमित करण्यात आले होते. विजेत्या विदयार्थ्यांना दयावयाच्या प्रमाणपत्राचे प्रारुपही केंद्र स्तरावरुन देण्यात आले होते. सर्व चित्रांचे परिक्षण करुन विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र स्पर्धेच्या दिवशीच देण्यांत येणार आहेत. सदरची प्रमाणपत्रे विधानसभा निहाय पहिले 3 विजेते, उत्तम 10 चित्रे आणि उत्तम 25 चित्रे अशाप्रकारे देण्यांत येणार आहेत.
चित्रकला स्पर्धेचे विषय:-
G-20 जागतिक विश्वगुरु बनण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल
आझादी का अमृत महोत्सव
सर्जिकल स्ट्राईक
कोरोना लसीकरण मध्ये भारत नंबर 1
पंतप्रधानांच्या जनसेवेच्या विविध योजना
स्वच्छ भारत अभियान
आत्मनिर्भर भारत
आंतरराष्ट्रीय योगदिन – मोदीजींनी वेधले जगाचे लक्ष
बेटी बचाव बेटी पढाव
चुलीतल्या धुराच्या त्रासातुन मुक्त महिला – मोदींचा संवेदनशील निर्णय
सदरचा कार्यक्रम हा पुर्णपणे अराजकीय पध्दतीने करावयाचा असुन त्यामध्ये राजकीय नेत्यांचे फोटो टाळणेबाबत स्पष्ट निर्देश देण्यांत आले होते.
सदर स्पर्धेबाबतचे फोटो, वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे, स्पर्धेतील विदयार्थ्यांच्या उत्तम चित्रांचे फोटो व स्पर्धेबाबतचा जिल्हयाचा अहवाल केंद्राकडुन मिळालेल्या लिंक वर अपलोड करणेबाबतच्या सुचनांप्रमाणे सदरचा अहवाल अपलोड करण्यांत येईल.
Published on : 25-01-2023 13:54:45,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update