कोव्हीड 19 चा प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांचा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10 दिवस लॉकडाऊनचा निर्णय ------------------------------------ कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी लॉकडाऊन नियंमाचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन
लॉकडाऊन कालावधी :- दि.03/07/2020 रोजी मध्यरात्री 12.00 ते
दि.13/07/2020 रोजी मध्यरात्री 12.000 वाजेपर्यंत.
लॉकडाऊन क्षेत्र :- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) व ठाणे बेलापूर टि.टि.सी. औद्योगिक क्षेत्र
(एम.आय.डी.सी.) वगळून संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन असणार.
एम.आय.डी.सी. क्षेत्रातील गांव-गावठाणे, झोपडपट्टी भागातही असणार लॉकडाऊन.
लॉकडाऊनमध्ये समाविष्ट महत्वाच्या गोष्टी :-
* अत्यावश्यक व नाशवंत वस्तूंची ने-आण करण्याशिवाय इतर सर्व गोष्टींकरिता लॉकडाऊन लागू असणार.
* अत्यावश्यक सेवेसाठी सुरु असलेली ठिकाणे, बसेस वगळता इतर इंटरसिटी, एमएसआरटीसी बसेस आणि ( शासनाने
अत्यावश्यक सेवेसाठी सुरु केलेली उपनगरीय रेल्वे सेवा वगळून) सर्व सार्वजनिक परिवहन सेवांना परवानगी दिली
जाणार नाही.
* टॅक्सी, ऑटोरिक्षा यांना परवानगी नाही. मात्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा घेण्यासाठी / देण्यासाठी प्रवाशांच्या वाहतूकीस
परवानगी असेल.
* वाहनचालकाशिवाय केवळ एका प्रवाशासह खाजगी वाहनांना, परवानगी असलेल्या जीवनावश्यक वस्तू, आरोग्य सेवा
आणि या आदेशाअंतर्गत मान्य कृतीकरीता परवानगी असेल.
* सर्व आंतरराज्यीय बस आणि प्रवासी वाहतूक सेवांचे (खाजगी वाहनांसह) तसेच खाजगी ऑपरेटरांकडून कामकाज बंद
असेल, तथापि बाहेरुन येऊन बाहेर जाणाऱ्या टुरिस्ट वाहनांना परवानगी असेल.
* ज्या व्यक्तीला घरात वेगळे ठेवणे आवश्यक आहे त्यांनी त्यांचे सक्त पालन केले पाहिजे. नाहीतर तो/ ती व्यक्ती कठोर
दंडात्मक कारवाईसाठी जबाबदार असेल आणि तिला/ त्याला महापालिकेच्या कॉरंटाईन सेंटरमध्ये स्थलांतरित केले
जाईल.
* सर्व रहिवासी घरीच राहतील आणि सामाजिक परवानगीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन, वरील नमूद केलेल्या
अटींचे पालन करुन , केवळ परवानगी असलेल्या कामासाठीच बाहेर येतील.
* सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक बाबींच्या खरेदीसाठी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध आहे.
* व्यावसायिक आस्थापना कार्यालये आणि कारखाने, कार्यशाळा, गोदाम इत्यादी (मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती व ठाणे
बेलापूर टि.टि.सी. औद्योगिक क्षेत्र वगळून) सर्व दुकाने त्यांचे कामकाज बंद ठेवतील. तथापि, सतत प्रक्रिया आणि
फार्मास्युटीकल्स इ. आवश्यक असलेल्या उत्पादन आणि उत्पादक युनिट्सना परवानगी असेल.
* डाळ व तांदुळ गिरणी, खाद्य व संबंधित उद्योग, दुग्धशाळा, खाद्य व चारा इत्यादींच्या, आवश्यक वस्तूंच्या उत्पादनात
गुंतलेली मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स चालविण्यास परवानगी असेल.
* सरकारी कार्यालये या कालावधीत कमीत कमी कर्मचाऱ्यांसह कार्यान्वित ठेवण्याची परवानगी असेल आणि ते चेक
काऊंटरजवळ एकमेकांपासुन 6 फूट अंतर ठेवणे अशा सामाजिक अंतराची खात्री करण्यासाठी पावले उचलतील.
ते त्यांच्या आवारात योग्य स्वच्छता आणि (हात) सॅनिटायझर्स/ हात धुण्याच्या सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करतील.
लॉकडाऊनमध्ये सुरू असतील अशा महत्वाच्या गोष्टी :-
* आवश्यक वस्तु आणि सेवा प्रदान करणाऱ्या खालील दुकाने/ आस्थापनांना वरील प्रतिबंधामधुन वगळण्यात येत आहे.
अ) जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, दूध, दुग्धजन्य दुकाने (डेअरी), बेकरी, किराणा दुकाने, भाजीपाला इत्यादी खाद्यपदार्थ आस्थापना सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. या सर्व दुकानांनी त्यांच्या दुकानांतून शक्यतो घरपोच सेवेद्वारे मालाची विक्री करण्याचा प्रयत्न करावा. तथापि “ मेडीकल स्टोअर्स, रुग्णालये/ क्लिनीक/एलपीजी गॅस सिलेंडर / उदवाहन दुरुस्ती (Lift) ही दुकाने ” सुरु ठेवण्यासाठी ही मर्यादा लागू असणार नाही.
आ) दूध विक्रीची दुकाने ही सकाळी 5.00 ते 10.00 या कालावधीत सुरु ठेऊन विक्री करता येईल.
इ) संबंधित विभागांचे सहाय्यक आयुक्त / विभाग अधिकारी तसेच प्रतिबंधीत क्षेत्रासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीने जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला घरपोच पुरविणेकामी आवश्यक ते नियोजन करुन सदर वस्तू नागरिकांना घरपोच सेवेद्वारे उपलब्ध होतील याबाबत कार्यवाही करावी.
ई) बँका/ एटीएम्स/ विमा/ आणि संबंधित बाबी.
उ) प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे.
ऊ) आय टी आणि आयटीईएस, टेलिकॉम, टपाल, इंटरनेट आणि डेटा सेवांसह.
ऋ) पुरवठा साखळी व जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक व उपलब्धता.
ऌ) कृषी वस्तू आणि उत्पादने आणि सर्व वस्तुंची निर्यात आणि आयात.
ऍ) अन्न, फार्मास्युटीकल्स आणि वैद्यकीय उपकरणे यासह आवश्यक वस्तूंचे ई कॉमर्स (वितरण).
ऎ) पाळीव प्राण्यासाठी बेकरी आणि पशुवैद्यकीय आस्थापना.
ए) फार्मास्युटीकल्स मॅन्युफॅक्चरिंग्ज आणि त्यांचे व्यापारी आणि त्यांची वाहतूक.
ऐ) पेट्रोल पंप,एलपीजी ,गॅस, तेल एजंन्सी, त्यांचे गोदामे आणि त्यांची संबंधित वाहतूक कार्ये ( केवळ अत्यावश्यक सेवेतील पास धारकांसाठी)
ऑ) खाजगी आस्थापना, ज्या आवश्यक सेवांच्या सहाय्यकारी सेवा किंवा कोविड-19 च्या नियंत्रणासाठी सहाय्य करणाऱ्या सेवा.
ऒ) वरील संबंधित पुरवठा साखळी.
ओ) सर्व सुरक्षा आणि सुविधा व्यवस्थापन सेवा (ज्यात खाजगी एजन्सीद्वारे) आवश्यक सेवा पुरविणाऱ्या संस्थांना
पुरविल्या जातात.
औ)मद्यविक्री दुकाने केवळ होम डिलीव्हरी अनुज्ञेय राहिल.
अं) जे इंडस्ट्रियल युनिट सद्यस्थितीत सुरु आहेत ते तसेच सुरु राहतील. तथापि, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती व ठाणे बेलापूर टि.टि.सी. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या व त्यांच्या आस्थापना सुरु ठेवताना भारत सरकार, आरोग्य मंत्रालय यांनी कोविड-19 प्रसार व नियंत्रणासाठी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. (मर्यादीत कर्मचारी संख्या, त्यामध्ये सोशल डिस्टंसिंग राखणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य राहील.)
अः) एम.आय.डी.सी हद्दीतील गांव - गावठाण व झोपडपट्टी क्षेत्रात लॉकडाऊनची अंमलबजावणी लागू राहील.
* राज्य सरकारचे विभाग/ कार्यालये आणि सेवा प्रदान करणारे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू ) केवळ
आवश्यक सेवा प्रदान करण्याच्या मर्यादेपर्यंत कार्य करतील.
* कोविड-19 रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व खाजगी व सरकारी रुग्णालयामध्ये सर्व वैकल्पिक
शस्त्रक्रीया नियोजित करण्यात याव्यात.
* संबंधित संस्था, संघटना व आस्थापनांच्या संदर्भात मा. पोलीस आयुक्त यांचे अधिनस्त अधिकारी, महापालिकेचे
अधिकारी आणि इतर सक्षम प्राधिकारी उपरोक्त नियम आणि अंमलबजावणीसाठी अधिकृत न्याय मार्गाने सर्व
आवश्यक उपाययोजना करतील.
* या नियमांच्या कोणत्याही तरतूदीचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती / संस्था यांचेवर साथरोग अधिनियम 1897,
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51 ते 60 अन्वये तसेच, भारतीय दंड संहिता यामधील कलम
188 अन्वये कारवाई केली जाईल.
* या नियमांनुसार कोणत्याही गोष्टी केल्यास किंवा चांगल्या हेतूने कोणत्याही गोष्टी केल्यास, त्या व्यक्तीविरुद्ध खटला
किंवा कायदेशीर कारवाई होणार नाही.
दि.03/07/2020 रोजी मध्यरात्री 12.00 ते दि.13/07/2020 रोजी मध्यरात्री 12.000 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेला हा दहा दिवसांचा लॉकडाऊन कोरोनाची साखळी खंडीत करून आपल्या नवी मुंबई शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचललेले एक महत्वाचे पाऊल असून सर्व नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.
Published on : 02-07-2020 12:25:20,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update